सध्या हिंगोली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे वंचित बहुजन आघाडीचे ओबीसी नेते डॉक्टर बी डी चव्हाण व महायुतीचे बाबुराव कदम कोहळीकर व महाविकास आघाडीचे अष्टीकर पाटील यांच्यात तिरंगी लढत असून प्रत्येक पक्षाचे उमेदवार आपापल्या परिने प्रचार करत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे डॉ बी.डी.चव्हाण प्रचारात प्रचंड आघाडी घेतली असून प्रस्थापित पक्षाला फेस आणलेला आहे वंचित बहुजन आघाडी ही गोरगरिबांची पार्टी असून भव्य दिव्य प्रचार गाड्या मोठमोठ्या प्रचार सभेला बगल देत ग्रामपंचायत च्या निवडणूक प्रमाणे घरोघरी जाऊन डमी मत पत्रिका वाटप करून मतदाराचे दर्शन घेऊन मतदान रुपी आशीर्वाद मागत आहे, व महाराष्ट्रात प्रस्थापित पक्षाने एकही बंजारा समाजाचे नेत्याला उमेदवारी नदिल्यामुळे बंजारा समाजामध्ये संतापाची लाट सुरू आहे म्हणून हिंगोली लोकसभा मतदार संघातील संपूर्ण गोर बंजारा समाजाकडून वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली लोकसभेचे उमेदवार डॉ.बी.डी. चव्हाण यांना गोरबंजारा समाजाकडून एकतर्फी जाहीर पाठिंबा देण्यात आल्यामुळे आपकी बार डॉ बी.डी.चव्हाण खासदार हे विद्र सत्यात उतरण्याची दाट शक्यता असून बंजारा बौद्ध मुस्लिम आदिवासी माळी गोपाळ परीट गवळी धनगर मातंग वंजारी पारधी बेरड बेलदार लहान लोहार पाथरवड सकलकरी गोसावी नाथजोगी पांगुळ शिंपी सह ओबीसी समाजातून चांगले पाठबळ मिळत आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली लोकसभेचे उमेदवार डॉ.बी.डी. चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.