हिंगोली: 12 जानेवारी- वृत्त: दरवर्षीप्रमाणेच यावर्षी हिंगोली येथे ‘राष्ट्रीय विचार मंच‘ ह्या सुधारणावादी व राष्ट्रीय विचारांनी प्रेरित मंडळींच्या समूहाने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीचे आयोजन इंदिरा गांधी चौकातील खंडेलवाल ह्यांच्या हॉल मधे केलं. राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन व वंदन करण्यात आले.ह्या प्रसंगी स्वागतपर प्रास्ताविकात आदर्श युवा पुरस्कार विजेते दलितमित्र पत्रकार डॉ.विजय निलावार ह्यांनी राष्ट्रीय विचार मंच निर्मिती मागे केवळ ‘राष्ट्रकल्याणार्थ’ झटणाऱ्या भूमिपुत्रांनाच ‘राष्ट्रीय विचार मंच’ मधे स्थान दिलं अस स्पष्ट केलं. राष्ट्रमातेचा शिकवण आणि आदर्श तसेच स्वामीजींची विचार सरणी अंगिकारून भविष्यात वाटचाल करण्याचं हे हिंगोली जिल्ह्याच रोल मॉडेल व्हावं ह्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प असल्याचं ते म्हणाले.
‘स्वामी विवेकानंद’ जयंती व ‘राजमाता जिजाऊ’ जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय विचारांने हिंगोली जिल्ह्याच्या विकासात सहभाग घेऊन राष्ट्रीय पातळीवर मंचाची ओळख निर्माण करण्याचे विचार मान्यवरांनी व्यक्त केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नामदेव कोरडे, भाजपा चे संजय खंडेलवाल, पत्रकार केशव भालेराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच मॉंसाहेब तसेच स्वामी विवेकानंद यांच्या विचार व कार्य यांचे स्मरण केले. हिंगोली येथील हृदय रोग तज्ञ डॉ.संजय नाकाडे, डॉ.गणेश अवचार ह्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊच्या जीवनावर प्रकाश झोत टाकून ते कर्तुत्वाने अमर झाले आहेत, आपणास त्यांचे चरित्र सर्वांनी अभ्यासण्याची गरज आहे असे सांगीतले.
ह्या प्रसंगी राष्ट्रीय एकात्मतेचा संकल्प करण्यात आला. सूत्र संचालन श्रीयुत कैलाशजी खांडल तसेच आभार प्रदर्शन डॉ.श्रीधर कंदी ह्यांनी केले. श्री.संजय खंडेलवाल, मधुसूदन अग्रवाल, जायांट्स ग्रुप चे अध्यक्ष किरण लाहोटी, महेश शहाणे, सुभाष लदनिया आदी मान्यवर सदस्य ह्या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या प्रसंगी युवक बालवर्ग व नागरिक उपस्थित होते. तसेच नागरिकांना मिठाई चे वाटप करण्यात आले.