जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा निराधारांना वाढीव अनुदान अशा विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनिल पतंगे व बंडू मुटकुळे ,जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण ,यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यासाठी शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने हिंगोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या आक्रोश मोर्चाची सुरुवात शासकीय विश्रामगृहपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून झाली यावेळी शहरातील मुख्य मार्गावरून या आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते हा धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला व तेथे सभेमध्ये रूपांतर झाले या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अनेक नेते उपस्थित होते यामध्ये शेतकऱ्यांना पिक विमा, निराधारांना वाढीव अनुदान अशा विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर,प्रदेश युवा अध्यक्ष शेख मेहबूब, जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण, हिंगोली जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे, मधुकरराव मुटकुळे, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते….