Friday, December 6, 2024
Homeताज्या-बातम्याहिंगोलीत शनिवारी भव्य छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी, प्रेस फोटोग्राफर व जिल्हा फोटोग्राफर...

हिंगोलीत शनिवारी भव्य छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी, प्रेस फोटोग्राफर व जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचा पुढाकार

हिंगोली : प्रतिनिधी

जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधून हिंगोली जिल्हा प्रेस फोटोग्राफर व हिंगोली जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन च्या वतीने 19 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता येथील कै. शिवाजीराव देशमुख सभागृहात एकदिवसीय कार्यशाळा, भव्य छायाचित्र सर्व व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी हिंगोली जिल्हा प्रेस फोटोग्राफर व हिंगोली जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यंदा शहरी व ग्रामीण भागातील छायाचित्रकारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून एक दिवशीय कार्यशाळा, भव्य छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जेष्ठ फोटोग्राफर मंडळींचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून मुंबई येथील फॅशन फोटोग्राफर विकास इंगळे तर मुख्य आकर्षण मॉडेल मोनिका नांदेडकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून आमदार तानाजीराव मुटकुळे, अध्यक्ष म्हणून भाऊराव पाटील गोरेगावकर तर उद्घाटक म्हणून संतोष बांगर तर प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैणे, हिंगोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी नगराध्यक्ष जगजीतराज खुराना, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, काँग्रेस नेते प्रकाश थोरात, माजी उपनगराध्यक्ष शेख निहाल, युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम, इंजि, अशोक अग्रवाल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे आदींची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हाभरातील फोटोग्राफर बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील पाठक, गोपाल बोरकर, जिल्हाध्यक्ष गजानन थोरात, सचिव संदिपान बोरकर, संतोष अर्धापूरकर, अमोल मुदीराज, सुनील प्रधान, विजय गुंडेकर, आर्या पवार, निलेश गरवारे, प्रज्वल कानेड, यांनी केले आहे. कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments