वाशिम : कितीही चर्चा झाली तरी खरी राष्ट्रवादी ही शरद पवार साहेबांकडेच राहणार. जे लोक स्वार्थासाठी व स्वतःच्या हितासाठी (NCP) सत्तेत जावून बसले आहेत. त्यांची भाषा बदलेली आहे. ती कशी बदलली हे आपण सर्वांनी बघितलं आहे. त्यामुळं येत्या काळात त्यांच्याकडे पक्ष नसणार; असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष संवाद यात्रा वाशिममध्ये दाखल झाली आहे. या यात्रेदरम्यान रोहित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावर होत असलेल्या सुनावणीबाबत आपली प्रतिक्रिया मांडली, तसेच भाजपवर निशाणा साधताना द्वेषाचं राजकारण भाजप कडून केलं जाते. हिंदू- मुस्लिम करण्याचा प्रयत्न, ओबीसी मराठा करण्याचा प्रयत्न सत्तेच्या लोकांनी केला असल्याचा आरोप देखील त्यांनी व्यक्त केला.