हिंगोली (जिमाका), दि. 21 : केंद्र शासनाच्या दिलेल्या सूचनेनुसार स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत हागणदारी मुक्त अधिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गावस्तरावर शौचालय व सार्वजनिक शौचालय बांधकाम व वापर तसेच सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण करुन गावे शाश्वत स्वच्छ करण्यासाठी राज्यात 30 ऑक्टोबर पासून विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात विशेष स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन हिंगोली जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी केले आहे. या विशेष अभियानांतर्गत ज्या कुटुंबाकडे शौचालय बांधणे शिल्लक आहे अशा कुटुंबाची यादी तयार करुन त्यांना शौचालय बांधकामाचा लाभ देणे. तसेच सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनासाठी या विशेष अभियानांतर्गत ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही अशा कुटुंबाची यादी तयार करुन त्यांना शौचालय लाभ देणे, तसेच सांडपाणी व्यवस्थापनासाठी वैयक्तिक पातळीवर भर देणे, घनकचरासाठी खतखडे कंपोस्ट पीट, नाडेप तयार करुन व्यवस्थापन करणे, प्लास्टिक संकलनासाठी सेग्रीकेशन शेड, कचरा उचलण्यासाठी ट्राय सायकल आवश्यक आहे. यासाठी गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी तालुक्यातील गावाचे नियोजन करुन गावे हागणदारीमुक्त अधिक होण्यासाठी गाव कर्मचाऱ्यांना दत्तक घेऊन 40 दिवसाच्या अभियानातून गावे शाश्वत स्वच्छ करावेत, असे आवाहन करण्यात आले. शौचालयाचा नियमित वापर होण्यासाठी शौचालय बांधकाम तांत्रिक दृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे. सदर बांधकाम योग्य प्रकारे होत असल्याची खात्री करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायती ग्रामसेवक विविध तांत्रिक अधिकारी, तालुका संगणक व समूह समन्वय ग्रामपंचायत कामाची पाहणी करतील. गाव स्वच्छतेसाठीही अभियानात ग्रामस्थांनी सहकार्य करावे.22 डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभाहागणदारी मुक्त अधिक साठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये येत्या 22 डिसेंबर, 2023 रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामसभेमध्ये शोचालय बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना मान्यता देणे तसेच शौचालय वापरासाठी प्रबोधन करणे. प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करणे, गावात सांडपाणी घनकचऱ्याची कामे पूर्णत्वाकडे नेणे, गाव शाश्वत स्वच्छतेसाठी तसेच हागणदारी मुक्त अधिक साठी लागणारे ठराव व्हिडिओ चित्रीकरण आदी विषय विशेष ग्रामसभेत घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील 563 ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. सर्व गटविकास अधिकारी यांच्याकडून ग्रामसेवकांना आदेशित करण्यात आले आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत, पाणी व स्वच्छता मिशन प्रकल्प संचालक आत्माराम बोंद्रे यांनी ग्रामसभा यशस्वीतेसाठी ग्रामस्थांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वच्छतेसाठी जिल्ह्यात विशेष अभियान22 डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन
RELATED ARTICLES