Friday, December 6, 2024
Homeताज्या-बातम्यास्वच्छता हीच सेवा या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – मुख्य...

स्वच्छता हीच सेवा या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने

हिंगोली (जिमाका), दि. 14 : स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत “ स्वच्छता ही सेवा” महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस साजरा केला जातो. या दिवशी दरवर्षी देशभरात स्वच्छता जनआंदोलन साजरे केले जाते. यावर्षी देखील स्वच्छ भारत दिवस २०२३ च्या निमित्ताने दि. १५ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्याबाबत केंद्र व राज्‍य शासनाच्या सूचना प्राप्त आहेत. या उपक्रमात नागरिंकानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

स्वच्छता हीच सेवा- २०२३ या उपक्रमाची थीम “कचरामुक्त भारत” ही आहे. यामध्ये दृष्यमान स्वच्छता व सफाईमित्र कल्याण यावर लक्ष केंद्रित केले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वच्छतेचे उपक्रम राबविणे आवश्यक असून यामध्ये स्वयंस्फुर्तीने श्रमदान करणे गरजेचे आहे. या स्वच्छता मोहिमेला लक्ष केंद्रित करुन जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील बसस्थानक, रेल्वे स्थानके, पर्यटन स्थळे, उद्याने व अभयारण्ये, ऐतिहासिक वास्तू, वारसास्थळे, नदी किनारे, घाट, नाले आदीं सार्वजनिक ठिकाणी ही मोहीम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी स्वच्छता प्रश्नमंजुषा, वृक्षारोपण मोहीम, स्वच्छता प्रतिज्ञा, स्वच्छता धाव स्पर्धेचे आयोजन करणे , नदीकाठ/ नाला मधील व परिसरातील प्लॅस्टिक कचरा साफ करण्यासाठी साफसफाई मोहीम राबविण्यात यावी, एकल वापराच्या प्लॅस्टिक (SUP) वस्तूंचा वापर रोखण्यासाठी जनजागृती करावी. त्याच बरोबर पर्यटनस्थळांची स्वच्छता मोहिम राबविण्यात यावी. त्या अनुषंगाने सुका व ओला कचरा कुंड्यांवरती हिरवा ओला, सुका, निळा या उपशिर्षाखालील मोहिम राबविण्यात यावी.

शाळेमध्ये स्वच्छता मोहिम राबवून वर्तणूक बदलाबाबत उपक्रम राबविण्यात यावे, या उपक्रमांमध्ये कचऱ्याची उत्पत्ती त्याच ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण, कचऱ्याबाबतचे व्यवस्थापन, नियोजन आणि कचऱ्यापासून मिळणारे उत्पन्न तसेच एकल प्लॅस्टिक बाबत पर्यायी वस्तू वापरण्याचे महत्त्व पटवून देण्यात यावे. त्याचबरोबर शक्य असेल तर शाळा/महाविद्यालयांमध्ये स्वच्छता गट स्थापन करण्यात यावेत.

भारतीय स्वच्छता लीग या स्वच्छतेसाठी युवकांच्या कृतीला चालना देण्यासाठी, युवकांच्या नेतृत्वाखालील सर्व गटांना एकत्रित करावे, या युवकांच्या गटांकडून स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून पर्यावरण विशेषतः टेकड्या व पर्यटन स्थळे स्वच्छ करण्यासाठी संपूर्ण तालुक्यात गट विकास अधिकारी यांचे संनियंत्रण दि.१७ सप्टेंबर २०२३ रोजी स्वच्छ मोहिमेचे आयोजन करण्यात यावे. या बाबतची मार्गदर्शक सूचना केंद्र व राज्‍य शासन स्तरावरुन प्राप्त झाल्या आहेत.

सफाईमित्र सुरक्षा शिबिर सर्व स्वच्छता कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून एकल खिडकी कल्याण शिबिराचे दि. १७ सप्टेंबर २०२३ पासून आयोजन करावे. या शिबिरामध्ये सर्व विभागाच्या केंद्र शासनाच्या योजनांचा सामावेश असावा. सफाईमित्र सुरक्षा शिबिरावरील तपशीलवार मार्गदर्शक सूचना केंद्र शासन स्तरावरुन सर्व संबंधितांना प्राप्त झाल्या आहेत.

स्वच्छता मोहीमेत नेहरु युवा केंद्राचे स्वयंसेवक, NCC, NSS, स्वच्छता प्रहारी, बचत गट, स्वच्छाग्रही, RWA, व्यापारी संघटना इत्यादींचा समावेश करुन स्वच्छता मोहिम व्यापक स्वरुपात आयोजित करण्यात यावी. स्वच्छता हि सेवा २०२३ अंतर्गत राबविण्यात आलेल्या श्रमदानाचे यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात यावा.

जलशक्ती मंत्रालय व गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्यामार्फत दि. १५ सप्टेंबर २०२३ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स कार्यक्रमाद्वारे संयुक्तपणे स्वच्छता ही सेवा या उपक्रमाचा शुभारंभ करुन संवाद कार्यक्रमाद्वारे सरपंच, महापौर, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गटविकास अधिकारी, पंचायत समिती तसेच ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे इतर अधिकारी आणि विविध मंत्रालय (पर्यटन आणि संस्कृती, वन/पर्यावरण, युवक कल्याण, कॅन्टोन्मेंट बोर्ड इ) यांच्या सोबत संबंधित विभागांचे सन्माननीय मंत्री महोदय संवाद साधतील त्यामुळे या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व सबंधितांनी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments