Sunday, December 8, 2024
Homeदक्षिण भारत राज्यशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, २०२२-२३. सुधारीत नियमावली नुसार वेगवेगळ्या खेळांसाठी अर्ज सादर...

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, २०२२-२३. सुधारीत नियमावली नुसार वेगवेगळ्या खेळांसाठी अर्ज सादर करावे

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, २०२२-२३. सुधारीत नियमावली नुसार इक्वेस्टेरियन, गोल्फ, यॉटींग, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस् अॅण्ड स्नूकर, सॉफ्टबॉल (पुरुष) व बेसबॉल (महिला) आणि जिम्नॅस्टिक्स (एरोबिक्स/अॅक्रोबॅटिक्स) या खेळांसाठी अर्ज सादर करावे.

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक / जिजामाता), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम) या पुरस्कारांच्या नियमावलीत दि. २९ डिसेंबर, २०२३ च्या शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आली आहे.

या सुधारित नियमावलीनुसार पुरस्काराकरीता पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीनुसार पुरस्काराकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. यातील पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीमध्ये शासनाने दि. २५ जानेवारी, २०२४ च्या शासन निर्णयानुसार सुधारणा केली असून, शासनाच्या दि. २९.१२.२०२३ रोजीचा शासन निर्णया सोबतच्या परिशिष्ट ४.४ येथे इक्वेस्टरियन, गोल्फ, यॉटींग, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अॅन्ड स्नुकर, सॉफ्टबॉल (पुरुष) व बेसबॉल (महिला) या खेळांचा समावेश करण्यास व मॉडर्न पेंटॅथलॉन या खेळामध्ये गुणांकन करताना टेट्राथलॉन या उपप्रकाराचा विचार शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार २०२२-२३ मध्ये करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

सुधारीत शासन निर्णयातील तरतुदीनुसार इक्वेस्टरियन, गोल्फ, यॉटींग, पॉवरलिफ्टींग,

बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अॅन्ड स्नुकर, सॉफ्टबॉल (पुरुष) व बेसबॉल (महिला) याच खेळांमधील खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांनी त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत. तसेच जिम्नॅस्टिक्स या क्रीडाप्रकारामधील एरोबिक्स/अॅक्रोबॅटिक्स क्रीडा प्रकारातील खेळाडू व मार्गदर्शकांनी देखील ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.

पुरस्काराकरिता अर्जाचा नमुना सोबत उपलब्ध करुन देण्यात आलेला असून, तो व्यवस्थितरित्या भरुन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे दि. २५ ते ३१ जानेवारी, २०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अर्ज स्वीकारण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे कार्यालय कार्यालयीन वेळेत सुट्टीच्या दिवशी देखील सुरु ठेवण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments