हिंगोली, दि.08(प्रतिनिधी) ः हळदीला मसाले पिक म्हणून बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हळदी पासुन मसाल्याचे विविध प्रकार, औषधे,सौंदर्यप्रसाधने अशा आदी निर्मितीची जागतीक बाजारपेठ आहे. यासाठी भारतातील वेगवेगळ्या उद्योग कंपन्यांशी आपल्या वसमत येथील मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा(हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र जोडले जावे म्हणून मी सर्वोतोपरी प्रयत्न करतआहे. यामुळे मराठवाड्यातील हजारो नागरिकांना ठोस रोजगार उपलब्ध होणार आहे. असे आश्वासन खासदार तथा केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिले. रविवारी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने नियामक मंडळाच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते.हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी(दि.८) रोजी ही बैठक पार पडली. या वेळी पुढे बोलताना मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद)संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील म्हणाले की, हळदीच्या उपयोगाला मर्यादा नाहीत. यामुळे त्याच्या कामाची व्याप्ती वाढविणे आवश्यक आहे. म्हणूनच केंद्रा अंतर्गत महाराष्ट्रात चार उपकेंद्र स्थापन करण्यात येतील. या माध्यमातून दरवर्षी जिल्हा हळद महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल.तसेच सर्व संबंधित कृषि विद्यापीठ, हळदी शी निगडीत विविध संशोधन केंद्र व विविध संस्थेशी सामंजस्य करार (MoU) करण्यात येतील.अशी ग्वाही खासदार तथा अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिली. वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर होणाऱ्या शेतकरी सन्मान सोहळा आणि मार्गदर्शन शिबिरास अध्यक्ष म्हणून देशोन्नती चे संपादक प्रकाश पोहरे, उद्घाटक म्हणून कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजु नवघरे, माजी खासदार शिवाजी माने,माजी आमदार गजानन घुगे, माजी विधान परिषद सदस्य रामराव वडकुते. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर या मान्यवरांसह शेतकऱ्यांना हळद लागवड तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी प्रा. मनोज माळी आणि हळद काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी प्रा. जितेंद्र कदम यांची उपस्थिती लाभणार असल्याची खासदार हेमंत पाटील यांनी माहिती दिली. केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप कच्छवे यांनी आभार मानले. या वेळी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अन्न व औषध प्रशासन अनिकेत भिसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनूप शेंगुलवार, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन पुणे महा संचालक आर. वी. भागडे, शासकिय सदस्य शिवाजी काकडे, लक्ष्मीनारायण मुरक्या, मन्मध सिद्धेवार, प्रतिक्षा पतंगे, मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.रविवारी वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित .राहण्याचे अध्यक्षांचे आवाहन – वसमत येथील मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राची रविवार दि.10 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. हिंगोली तील तिरूपती लॉन व मंगल कार्यालय येथे ही सभा होणार आहे. या वेळी हळद पिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकऱ्याचा सन्मान केला जाणार आहे. तसेच दुपारच्या सत्रात शेतकऱ्यासाठी हळद पिक कार्यशाळेचे आयोजन केले आहे. तरी यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे.
वसमत येथील हळद संशोधन केंद्र औद्योगिक कंपन्यांना जोडणार – खासदार हेमंत पाटील
RELATED ARTICLES