हिंगोली/प्रतिनिधी : मागील काही दिवसांपासून भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून सातत्याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांना हत्या करण्याच्या आणि जिविताला धोका निर्माण करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.
तरी राहुल गांधी यांना धमक्या देणाºया नेत्यांवर गुन्हे नोंद करुन त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी पोलिस अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या नेत्यांकडून लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांची हत्या करण्याच्या, त्यांची जीभ कापण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.
त्यासाठी बक्षीसे जाहीर केली जात आहेत. त्यामुळे राहुलजी गांधी यांच्या जिवितास भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या नेत्यापासून धोका आहे हे स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील भाजपाचा नेता तरविंदरसिंह मारवा याने राहुल गांधीची अवस्था त्यांच्या आजी इंदिरा गांधी प्रमाणे करू अशी खुलेआम धमकी दिली आहे. भाजपाचा केंद्रीय मंत्री रवनित बिट्टू यांनी राहुल गांधी यांना दहशतवादी म्हटले आहे. शिंदेच्या शिवसेनेचा आमदार संजय गायकवाड यांनी राहुलजींची जीभ कापणाºयास ११ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
भाजपाचा राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या जिभेला चटके दिले पाहिजेत असे वक्तव्य केले आहे. भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या नेत्यांची ही वक्तव्ये अत्यंत गंभीर असून राहुलजींच्या जिविताला यांच्या पासून धोका आहे हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पण सरकार आणि भाजपाने अद्यापाही धमक्या देणाºया नेत्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे हे सर्व जाणिवपूर्वक सुरु आहे हे स्पष्ट झाले आहे. राहुलजी गांधी यांच्या आजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांची हत्या देशविघातक घटकांनी केली आहे. त्यामुळे या धमक्यांना गांभार्याने घेण्याची गरज आहे. विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी सातत्याने संसदेत आणि देशभरात सामाजिक न्यायाचा आवाज बुलंद करत आहेत. जातनिहाय जनगणना करण्याची व आरक्षण देण्याची मागणी केली आहे. या गोष्टींना ज्यांचा विरोध आहे ते लोक राहुल गांधी यांच्याबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्ये करण्याची, जीवे मारण्याच्या धमक्या देण्याची सुनियोजित मोहीम चालवत आहेत. तरी राहुल गांधीना धमक्या देणाºया नेत्यांवर गुन्हे नोंद करुन त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी करून मा.आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौक येथे धरणे प्रदर्शन करून पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर भाऊराव पाटील गोरेगावकर,भास्कर बेंगाल,शेख नईम शेख लाल, आबेद अली खान,.के.जे. अरगडे,शेख नौमान नवेद,सतीश लोणकर,साद अहमद,पवन उपाध्याय,दाजीबा पाटिल,एकनाथ शिंदे,आकाश जगताप,बापूराव पाटिल,शेख बासिद,पाठन साजिद ख़ान,उल्हास पाटिल ,लाखन पाठाडे,आकाश जाधव,कालिम ख़ान,अमोल पाटिल, शेख इस्माइल,शालिक ताले,शिवपर्साद जाधव,संतोष जाधव,संजय देखमुख,अक्षय ढकोरे,शेख शाहनवाज़,शेख आवेस,ज़ाहिर पठान,आमेर बाग़बान,शेख इरफ़ान,अमोल खिल्लारी,जावेद चाऊस,मो अखिब,मो परवेज़ ,मो तोहिद,पांडुरंग,सरनाईक,रऊफ़ ख़ान,आलम ख़ान, इत्यादी उपस्थित होते