लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या आचारसंहिता अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज कळमनुरी परिसरात केलेल्या कारवाईत मद्यनिर्मितीसाठी लागणाऱ्या ६०० लिटर रसायनासह दुचाकी असा ९६ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन नुरखाँ अमिणखाँ पठाण रा. इंदिरा नगर कळमनुरी या आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. या कारवाईत हातभट्टी निर्मिती व वाहतूक प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक श्री. के.जी. पुरी, जवान श्री के. एल. कांबळे, दशरथ राठोड, पंडीत तायडे आणि श्री. वाघमारे यांनी पार पाडली असल्याचे अधीक्षक आदित्य पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.