हिंगोली येथे यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने हिंगोली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार तान्हाजीराव मुटकुळे साहेब यांना, संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. मुटकुळे साहेबांनी मागील दहा वर्षात शेतकरी,विद्यार्थी,कष्टकरी, या सर्वांसाठीच महत्वाचे योगदान राहिले आहे. त्यामुळेच मागील विकासाच्या जोरावर मुटकुळे साहेबांना पुन्हा एकदा निवडून आणणारच असा निर्धार यशवंत संघर्ष सेना संघटनेच्या वतीने करण्यात आला, यावेळी उपस्थित तान्हाजीराव मुटकुळे,के. के. शिंदे, नारायणराव खेडेकर यशवंत संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष, विष्णू भाऊ कुऱ्हाडे, युवा नेतृत्व प्रीतम सरकटे, नंदकुमार नायक प्रशांत शेठ गोल्डी, पद्माकर नायक व समाज बांधव, यशवंत संघर्ष सेना पदाधिकारी, कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.
यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने महायुतीचे अधिकृत उमेदवार तान्हाजीराव मुटकुळे यांना संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा
RELATED ARTICLES