Friday, December 6, 2024
Homeताज्या-बातम्यामोठी बातमी! शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ

मोठी बातमी! शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ

मुंबई– शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांना आणखी दहा दिवसांचा वेळ देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. त्यामुळे आता १० जानेवारीपर्यंत त्यांना वेळ मिळेल. याआधी सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी सुनावणी घेताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. ( Shiv Sena MLA disqualification case extended by Supreme Court to Assembly Speaker)

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी जवळपास दररोजच विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे. दोन्ही गटांकडून युक्तीवाद केला जात आहे. दोन्ही गटाचे वकील आपली बाजू जोरकसपणे मांडत आहेत. राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणी निर्णय देण्यासाठी आणखी तीन आठवड्यांचा वेळ देण्याची मागणी सुप्रीम कोर्टाकडे केली होती. अध्यक्षांची ही मागणी मान्य झाली आहे. पण, त्यांना फक्त दहा दिवसांचा वेळ मिळालाय.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाला लागत असलेल्या विलंबामुळे सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली होती. विधानसभा अध्यक्षांना झापतानाच याप्रकरणी वेळेत सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. सुप्रीम कोर्टाने ३१ डिसेंबरपर्यंत याप्रकरणी निकाल देण्यास सांगितलं होतं. त्यानुसार, राहुल नार्वेकर सुनावणी घेत आहेत. पण, त्यांनी आणखी तीन आठवड्यांचा वेळ कोर्टाकडे मागितला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments