Thursday, September 19, 2024
Homeताज्या-बातम्यामेथा येथील रस्ता दुरुस्त करून द्या गावकऱ्यांची मागणी…

मेथा येथील रस्ता दुरुस्त करून द्या गावकऱ्यांची मागणी…

मुख्य रस्ता खरडून गेल्याने जनजीवन विस्कळीत….

मोठी हानी होण्याची भीती …
औंढा तालुक्यातील मौजे मेथा येथे 1 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे गावाचा शहराशी संपर्क जोडणारा मुख्य रस्ता वाहून गेला आहे या रस्त्यावरती एवढ्या मोठ्या भेगा पडल्या आहेत की यामध्ये पाच ते सहा फुटाचे खड्डे पडले आहे परिणामी येथील दळणवळणाची सर्व साधने बंद झाले आहे .

गावाचा शहराशी असणारा संपर्क तुटल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे याबाबतीत आज जिल्हा परिषद हिंगोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी ग्रामपंचायत मेथ्याच्या वतीने निवेदन देण्यात आले .

या वेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष मनिष आखरे,सरपंच सारिका आणेकर उपसरपंच पिराजी लोंढे सदस्य गंगाधर लोंढे भगवानरावजी लोंढे बळी रामजी शिंदे विकास आने कर संतोष शिंदे नितीन शिंदे ज्ञानेश्वर गिरी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments