Sunday, December 8, 2024
Homeदक्षिण भारत राज्यमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध

लातूर, दि. 28 (विमाका):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2024 मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या https://mpsc.gov.in व https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे आयोगाचे उपसचिव दे. वि. तावडे यांनी कळविले आहे.

शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक आयोगाकडून निश्चित करण्यात आले आहेत. प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत व उमेदवारांचे नुकसान होणार नाही यादृष्टीने आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते. तरी सर्व संबंधित संस्थांनी परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याची दक्षता घेण्याची विनंती संस्थांना आयोगाने केल्याचेही त्यांनी कळविले आहे.इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच आयोगाकडून वेळोवेळी जाहिर करण्यात येणाऱ्या सुचनांसाठी आयोगाच्या वरील संकेतस्थळास उमेदवारांनी वेळोवेळी भेट द्यावी, असे आवाहनही आयोगाव्दारे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments