Saturday, November 2, 2024
Homeमहाराष्ट्रमहापरिनिर्वाण दिनी सोयी-सुविधांचे काटेकोर नियोजन होणार, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश

महापरिनिर्वाण दिनी सोयी-सुविधांचे काटेकोर नियोजन होणार, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर रोजी ६७ वा महापरिनिर्वाण दिन आहे. यासाठी दादर चैत्यभूमी, आणि मुंबईतील बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडीत विविध स्थळांच्या ठिकाणी दर्शन व्यवस्था तसेच छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील मध्यवर्ती व्यवस्था याठिकाणी जय्यत सुरू आहे. याचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. तसेच अधिकाऱ्यांना महापरिनिर्वाण दिनासाठी अनुयायांच्या सोयी-सुविधांचे काटेकोर नियोजन करा, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

अधिकाऱ्यांना निर्देश देताना ते म्हणाले आहेत की, ‘‘महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. त्यांना आवश्यक त्या सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे.” 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गतवर्षी लाखो अनुयायी आले होते. त्यांची मुंबई महापालिका आणि सर्वच यंत्रणांनी उत्तम व्यवस्था केली होती. यंदाही आवश्यकता वाटल्यास आणि गतवर्षीच्या व्यवस्थेतील त्रुटी दूर करून जास्तीत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. बेस्ट, एसटी यांची परिवहन व्यवस्था, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून तसेच पोलीस बंदोबस्त याबाबत चोख नियोजन करण्यात यावे.

आरोग्य आणि स्वच्छता, साफ- सफाई याबाबत संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे जबाबदारी पार पाडली पाहिजे, यांची दक्षता घेण्यात यावी. अनुयायींची भोजन, निवास आणि आरोग्य सुविधा याबाबतही मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या.

बैठकीत मुंबई महापालिकेच्यावतीने नियोजनाची सविस्तर माहिती सादरीकरणातून देण्यात आली. शिवाजी महाराज मैदानावरील भव्य निवास मंडप, तेथील आपत्कालीन व्यवस्थेसह, आरोग्य सुविधा, प्रदर्शन मंडप, चैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावट, महापरिनिर्वाण दिन मानवंदना शासकीय कार्यक्रम, पोलीस पथक मानवंदना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, “लोकराज्य” चा विशेषांक, शासकीय जाहिरात प्रसिद्धी याबाबत चर्चा झाली व निर्देश देण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments