Friday, December 6, 2024
Homeताज्या-बातम्यामराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे...

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) 17 ऑक्टोबर रोजी हिंगोली दौऱ्यावर

नागरिकांनी त्यांच्याकडील दस्तावेज 2 ते 4 या वेळेत उपलब्ध करुन देण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 15 : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य हे 17 ऑक्टोबर, 2023 रोजी हिंगोली जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.मंगळवार, दि. 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.00 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून निघून सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव. सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे बैठक, दुपारी 1.00 ते 2.00 वाजता राखीव. दुपारी 2.00 ते 4.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे नागरिकांकडून पुरावे स्वीकारणार आहेत. सांय. 4.30 वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने नांदेडकडे प्रयाण करतील.जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करुन देण्यात यावीत. पुरावा शक्यतो साक्षांकित असावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments