Thursday, September 19, 2024
Homeदक्षिण भारत राज्यमराठवाडा सामाजिक फाउंडेशन मराठवाड्यातील विधानसभेच्या 46 जागा लढवणार मराठवाडा सामाजिक फाउंडेशन च्या...

मराठवाडा सामाजिक फाउंडेशन मराठवाड्यातील विधानसभेच्या 46 जागा लढवणार मराठवाडा सामाजिक फाउंडेशन च्या वतीने कौटुंबिक स्नेह मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

हिंगोली शहरातील स्वप्नपूर्ती मंगल कार्यालय येथे मराठवाडा सामाजिक फाउंडेशन च्या वतीने स्नेह कुटुंब मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रथम जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज भारत भारतीय घटनेतील घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन शिवाजीराव बल्लाळ बोराडे पाटील तसेच मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली .

या मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचा सामाजिक सुत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले या कौटुंबिक स्नेह मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रथमता मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल क्षीफळ पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला तसेच गुणवंत विद्यार्थी वेदांत शिवचरण वाबळे यांने या छोट्याशा मुलाने अक्षरक्षा शिक्षकाचे मने जिकले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मुल मंत्र भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कित्येक वर्षापासून दिला तो प्रत्येकाने अंगिकार केला तर या भारत देशात कुणीच प्रगती पासुन वंचित रहाणार नाही महापुरुषांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्याचे काम वेदांत शिवचरण वाबळे यांनी केले तसेच मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे शिवाजी बल्लाल याचं मनापासून हार्दिक शुभेच्छा दिल्या दुसऱ्याच्या सुखात दुःखात सहभागी होण्याचे काम करून नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी अन्यायाविरुद्ध लढा देत शोषित वंचित पिडीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या सर्व समाजातील नागरिकांनी पाठबळ द्यायला हवं तरच आपला विकास होईल असं सांगितलं.यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे शिवाजी बल्लाल सर यांनी आपल्या भाषणातून मला कोरोनाने कसं जगायचं हे शिकवले आहे कोरोनात माझी परीस्थिती बिकट असतानाही मी सावरलो आहे मी मराठवाडा सामाजिक फाउंडेशन माध्यमातून सामाजिक जनजागृती करण्याचं काम सुद्धा सुरू आहे करत राहिले पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहे असं सांगितले आहे यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात महापुरुषांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्याचे काम केले महापुरुषांचा वारसा जोपासत तो पुढे नेण्यासाठी मराठवाडा सामाजिक फाउंडेशन करणारं आहोत.या कार्यक्रमासाठी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments