Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वाई येथे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते...

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वाई येथे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण

हिंगोली, (जिमाका) दि. 16 : येथील विभागीय वन अधिकारी श्री. गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक हिंगोली, वन परिमंडळ कळमनुरी अंतर्गत मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित मौजे वाई या गावी दि. 15 सप्टेंबर, 2023 रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी स्वातंत्र्य सैनिक यांचे वारस पांडूरंग आनंदराव वाघमारे यांच्या हस्ते 75 वृक्षांची वृक्षारोपण करण्यात आले व मनुष्यहानी अंतर्गत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीस नुकसान भरपाईचा धनादेश जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्या हस्ते देण्यात आला.

याप्रसंगी कळमनुरीच्या तहसीलदार सुरेखा नांदे, हिंगोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती पवार, सेनगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी शेळके, वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती चाटे, मौ. वाई गावातील प्रथम नागरिक सरपंच विलासराव मस्के व गावातील प्रतिष्ठित नागरिक, वनअधिकारी, वन कर्मचारी तसेच महसूल कर्मचारी उपस्थित होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments