Friday, December 6, 2024
Homeताज्या-बातम्यामतदान जनजागृतीसाठी बचत गटातील महिलांचा पुढाकार

मतदान जनजागृतीसाठी बचत गटातील महिलांचा पुढाकार

दारेफळ व खांडेगाव येथील महिलांनी घेतली मतदानाची प्रतिज्ञा.

जिल्ह्यातील महिला बचत गटांनी 26 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. या बचत गटातील महिलांनी जिल्ह्यातील दारेफळ व खांडेगावसह जिल्ह्यातील विविध गावामध्ये मतदान जनजागृतीसाठी मतदानाची प्रतिज्ञा घेतली आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांच्या मार्गदर्शनात दि. 5 एप्रिल रोजी बचत गटांच्या महिलांची ऑनलाइन बैठक घेऊन मतदान जनजागृतीसाठी राबवावयाच्या उपक्रमाबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले होते.
जिल्ह्यात साधारणत: 100 सदस्य असलेल्या एक हजार महिला बचत गट आहेत. जिल्ह्यातील महिला बचत गटाच्या एक लाख महिलांनी दि. 7 व 8 एप्रिलला मतदार जनजागृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने अनेक ठिकाणी रॅली, बैठका तसेच मतदान जनजागृतीची प्रतिज्ञा घेऊन लोकशाहीत मतदानाचे महत्त्व पटवून देण्याचे काम करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments