हिंगोली व सेनगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या बूथ अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत हिंगोली विधानसभेचे महायुतीचे भाजपचे अधिकृत उमेदवार तानाजीराव मुटकुळे यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन पक्षाच्या सर्व नेत्यांनी केले.
त्यास भरघोस संख्येने उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही महायुतीचे उमेदवार तानाजीराव मुटकुळे यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी जीवाचे रान करू असे आश्वासन दिले. यावेळेस व्यासपीठावर सर्वश्री जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बि डी बांगर,माजी खासदार शिवाजीराव माने, माजी आमदार रामरावजी वडकुते ,रामदास जी पाटील सुमठाणकर, बाबारावजी बांगर दुर्गादासजी साकळे उपस्थित होते.भाजपचे सर्व इच्छुक एकाच मंचावर उपस्थित राहून एकदिलाने कामाला लागल्याचे पाहून सर्व कार्यकर्त्यांत उत्साह संचारला.