.lहिंगोली प्रतिनिधी हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी ओढ्या नाल्यांना महापुर आला नदीच्या काठावरील शहरी भागातील नागरिकांच्या घरात पाणी घुसले काही गावांना तर पाण्याने वेडा घातला होता शेत शहरातील झम झम काॅलनी , आझम काॅलनी,बावन खोली या काॅलनीतील घरात पाण घूसल्याने घरातील सर्व अन्नधान्य पाण्यात वाहून गेले झालेल्या पावसामुळे काही कुटुंब स्वतःच्या घरातून इतर ठिकाणी आसरा घेऊन राहू लागले, पूर बाधित कुटुंबांना भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या वतीने अन्नधान्य व किराणामालाची किट झम झम काॅलनी, आझम काॅलनी, बावन खोली,खाजा काॅलनी , भारत नगर, रशीद काॅलनी,या ठिकाणी मदत म्हणून अन्नधान्य किट वाटप करण्यात आली.
यावेळी हिंगोली विधानसभा चे मा आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर,यूवा नेते रणजीत पाटील गोरेगावकर, भास्करराव बेंगाळ,शेख नईम लाल,साद अहेमद सर,अबेद आली जाहगीरदार,रहीमान भाई,नोमान शेख नईम,शमीम पठाण, अशोक चव्हाण, नामदेवराव पवार,अक्षय डाखोरे,अरूण पाटील, मदन शेळके, गजानन पाटील, शेख इस्माईल,शेख आवेस आदी कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष काॅलनीत जाऊन बाधित कुटुंबांना अन्नधान्य व किराणा मालाची किट कुटुंबाच्या उपस्थितीत वाटप करण्यात आली, या उपक्रमाची हिंगोली जिल्ह्यात मोठी चर्चा होत असून भाऊराव पाटील गोरेगावकर हे समाजकार्य करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असते कोणत्याही संकटात भाऊराव पाटील गोरेगावकर नागरिकांसाठी संकट समयी मदत करण्यास तत्पर असतात त्यांचे लोकउपयोगी सामाजिक विविध उपक्रम मागील चाळीस वर्षां पासून चालू आहेत