Saturday, November 2, 2024
Homeमराठवाडाभव्यशक्ती प्रदर्शनाने मा आमदार भाऊ पाटील यांनी केला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

भव्यशक्ती प्रदर्शनाने मा आमदार भाऊ पाटील यांनी केला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

हिंगोली विधानसभेवर अपक्ष उमेदवार निवडून येण्याची विरोधकांना भीती

हिंगोली विधानसभेचे सलग पंधरा वर्षे आमदार राहिलेले माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी ऐनवेळी महाविकास आघाडीने हिंगोली विधानसभेचे जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला दिल्यामुळे आज हजारो कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य शक्ती प्रदर्शन करून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला .

यामुळे हिंगोली विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला मोठे खींडार पडले असुन महाविकास आघाडीला मोठे नुकसान होणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करीत असताना घेतलेल्या सभेमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी हिंगोली जिल्हा काँग्रेस मुक्त करण्याचा प्रयत्न केला असून आतापर्यंत मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाच्या संघटनासाठी कार्य केले परंतु वरिष्ठांनी हिंगोली जिल्ह्यातील तिन विधानसभांपैकी एकही विधानसभा काँग्रेससाठी सोडवुन घेण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे हिंगोली जिल्हा काँग्रेस मुक्त होऊ नये तसेच माझ्याशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते कायम जोडलेले राहावेत यासाठी मी हिंगोली विधानसभेतून अपक्ष उमेदवारी दाखल करीत असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखविले आणि हिंगोली विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवारी दाखल करून मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याची हामी त्यांनी यावेळी दिले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments