Thursday, September 19, 2024
Homeमराठवाडाब्राह्मणवाडा ग्रा.पं.सरपंचपदी सुमन मेटकर यांची बिनविरोध निवड

ब्राह्मणवाडा ग्रा.पं.सरपंचपदी सुमन मेटकर यांची बिनविरोध निवड

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील ग्रामपंचायत चे रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडीसाठी १४ ऑगस्ट रोजी बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सरपंच पदासाठी सुमनबाई निळकंठ मेटकर यांचा एकमेव अर्ज अध्याशी अधिकार्‍याकडे प्राप्त झाल्याने ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ सुमन निळकंठ मेटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडीबद्दल सुमनबाई मेटकर यांच्यासह उपसरपंच व सदस्यांचा गावकर्‍यांनी सत्कार केला.सेनगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील ग्रामपंचायत ही सात सदस्याचे असून तत्कालीन सरपंच सुनीता बाळू चव्हाण यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. या ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाचे पद हे रिक्त होते. सरपंच पदाच्या निवडीसाठी १४ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात सदस्याची विशेष बैठक बोलवण्यात आली होती. निर्वाचन अध्याशी अधिकारी जी. पी. दंडीमे यांनी सरपंच पदासाठी इच्छुक असणार्‍या अर्ज दाखल करण्याची सूचना केल्यानंतर ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी सौ सुमनबाई निळकंठ मेटकर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने पीठासन अधिकारी जी.पी. दंडीमे यांनी बिनविरोध झाल्याची घोषणा केली. यावेळी तलाठी अनिल महेंद्रकर, ग्रामसेवक मारुती कावरखे उपस्थित होते. त्यानंतर सरपंचपदी सुमनबाई निळकंठ मेटकर यांच्यासह उपसरपंच, सदस्यांचा पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार शिवाजीराव मेटकर, अरुणा पंडित, भीमराव वैद्य, कौसल्या राठोड,सुनिता बाळू चव्हाण, प्रकाश पंडित देविदास पंडित,उद्धवराव वायचाळ, दिलीप वायचाळ, श्रीराम पंडित, निळोबा पंडित, गौतम पंडित, यशवंता वैद्य,उमेश राठोड, नारायण चव्हाण, सिद्धार्थ पंडित, लक्ष्मण वायचाळ, बंडू वायचाळ, शिवराम वायचाळ, किशोर वायचाळ,ज्ञानदेव कोंधे, गजानन वायचाळ, अमोल कोंधे, विठ्ठल वाघमारे,कडूजी पंडित, कैलास पंडित, जमन बनसोडे, विष्णू वायचाळ,बाळू चव्हाण, केशव वायचाळ,आत्माराम आडे,बंडू चव्हाण, बाबुराव राठोड, आत्माराम मेटकर,ज्ञानबाराव वायचाळ, अशोक वायचाळ,ओम मेटकर, हनुमान वायचाळ, अशोक कोंधे,वैजनाथ मेटकर,गणेश कोंधे, खंडू आडे, पोलीस पाटील सखाराम आडे, ग्रामपंचायत कर्मचारी मोतिराम वायचाळ, जगन वायचाळ, बन्सोंडे, शिवाजी कोघे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments