हिंगोली शहरातील संत मानदास नगर (बावनखोली) भागातील दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथे आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या वीस लक्ष रुपयांच्या निधीतून सभा मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले
यावेळी आमदार साहेबांनी परिसरातील नागरिकांच्या राशन संदर्भातील तसेच सांडपाणी संदर्भातील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
आमदार साहेबांनी हनुमान मंदिराला सभा मंडप दिल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आमदार साहेबांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी के के शिंदे भाजपचे शहराध्यक्ष कैलास चंद्र काबरा, हमीद भाई प्यारे वाले, प्रशांत गोंल्डी सोनी, रजनीश पुरोहित, गुड्डू देवकते, रघुनाथ पावडे, सुभाषराव सिंगारे, बजरंग लाला जयस्वाल, विनोद कुरील, मदन बरीदे, ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते.