Thursday, September 19, 2024
Homeदक्षिण भारत राज्यबदलापूर अत्याचार प्रकरणी काँग्रेस आक्रमक, आ,प्रज्ञाताई सातवांचे कळमनुरीत सरकार विरोधात निदर्शने

बदलापूर अत्याचार प्रकरणी काँग्रेस आक्रमक, आ,प्रज्ञाताई सातवांचे कळमनुरीत सरकार विरोधात निदर्शने

कळमनुरी (प्रतिनिधी) बदलापूरमध्ये घडलेल्या या घटने विरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. बदलापूर येथील एका प्रख्यात शाळेत शिकत असलेल्या ४ वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ या प्रकरणी आरोपीला फाशी देण्याची मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षा आ.प्रज्ञाताई सातव यांच्यासह शेकडो महिलांनी कळमनुरीत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.

आज कळमनुरी येथिल उपविभागिय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पाठाविण्यात आलेल्या निवेदनात आरोपींवर जल्दगति न्यायलयात खटला चालवून फाशी शिक्षा देण्यात यावी आशी मागणी करण्यात आली यावेळी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष वनिताताई गुंजकर,काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा सुवर्णाताई गाभणे,जयश्रीताई सातव,अर्चना जाधव,छाया गाभणे,विजयमाला डोके,रंजनाताई खंदारे,जयश्रीताई मोरे,मनिषा गायकवाड,सिंधुताई जांबुतकर,कुसुम काटकर,लताबाई गुंजकर,शुभांगी खंदारे,आशाताई खंदारे,अनिता थोरात,अमिना पठाण,नंदा गुंजकर,चंदा क्षिरसागर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला काँग्रेसच्या पदधिकारी यांची उपस्थिती होती.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आ.प्रज्ञाताई सातव म्हणाल्या की,बदलापुरातील अशा विकृत मानसिकतेच्या नराधमांना कायमची अद्दल घडवून समाजात अशी विकृती पुन्हा जन्म घेऊ नये यासाठी शासनाने कठोर पावले उचलुन योग्य ते उपाय योजना करुन नागरिकांना भयमुक्त करावे आणि राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार उज्वल निकम यांची या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे ते पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी भाजप नेत्याला पाठीशी घालतील अशी शंका निर्माण झाली आहे,त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून पीडित मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष सरकारी बदलून दुस-या निष्पक्ष वकील आणि पोलीस अधिका-यांची नियुक्ती करावी,वरील माग्ण्यां संदर्भात तात्काळ कारवाई न केल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने पुढील काळात अधिक तिव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा आ.प्रज्ञाताई सातव यांनी दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments