Friday, December 6, 2024
Homeताज्या-बातम्या‘पंतप्रधान मोदी ‘ओबीसी’ असल्याचा दावा खोटा’, राहुल गांधींनी थेट मोदींच्या जातीचा केला...

‘पंतप्रधान मोदी ‘ओबीसी’ असल्याचा दावा खोटा’, राहुल गांधींनी थेट मोदींच्या जातीचा केला उल्लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करत असताना स्वतःला सर्वात मोठा ओबीसी असल्याचे म्हटले होते. या खुलाश्यातून काँग्रेसकडून होणाऱ्या टीकेला मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या विषयात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीचा उल्लेख केला आहे. गुरुवारी भारत जोडो न्याय यात्रेत बोलत असताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या जातीबद्दल चुकीची माहिती पसरवली. पंतप्रधान खुल्या प्रवर्गातील आहेत. ओबीसी प्रवर्गाशी त्यांचा काहीही संबंध नाही.

पंतप्रधान मोदींच्या जातीचा थेट उल्लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी प्रवर्गातील जातीत जन्मलेले नाहीत. त्यांचा जन्म गुजरातच्या ‘तेली’ जातीत झाला आहे, अशी माहिती राहुल गांधी यांनी ओडिशा येथील झरसूगुडा येथे बोलताना दिली. या जातीला ओबीसी भाजपाने २००० साली ओबीसी प्रवर्गात टाकले. त्याआधी तेली जात खुल्या प्रवर्गात होती, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, ओबीसी प्रवर्गात जन्मलेले नसल्यामुळे पंतप्रधान मोदी हे खूप आधीपासून जातीनिहाय जनगणनेला विरोध करत आले आहेत. कारण ते खुल्या प्रवर्गाचे प्रतिनिधित्व करतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

आज भारत जोडो न्याय यात्रा ओडिशामधील टप्पा पूर्ण करून छत्तीसगड राज्यात प्रवेश करणार आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राहुल गांधी यांचा छत्तीसगडमधील हा पहिलाच दौरा आहे. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भाजपाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. १४ फेब्रुवारी रोजी बलरामपूर येथून ही यात्रा झारखंडच्या दिशेने प्रयाण करणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments