Friday, December 6, 2024
Homeकरियरनोकरीची संधी

नोकरीची संधी

राज्य उत्पादन शुल्क विभागातील महाराष्ट्र राज्यामधील विविध कार्यालयांतील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान नि वाहनचालक व चपराशी पदांची भरती. एकूण रिक्त पदे – ७१७.

(अ) राज्यस्तरीय संवर्गातील पदे – एकूण ६६४.

(१) लघुलेखक (निम्नश्रेणी) (Stenographer Lower Grade) – ५ पदे (अजा – १, विजा-अ – १, इमाव – १, आदुघ – १, खुला – १).

पात्रता : (i) १० वी उत्तीर्ण, (ii) लघुलेखनाची गती १०० श.प्र.मि., (iii) मराठी टंकलेखनाची गती ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० श.प्र.मि. (शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक.)

(२) लघुटंकलेखक (Stenotypist) – १८ पदे (अजा – २, अज – १, विजा-अ – १, भज-ब – १, भज-क – १, इमाव – ३, आदुघ – २, खुला – ७) (१ पद दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव). पात्रत्रा – ( ) १० वी उत्तीर्र्र्ण, ( ) लघुलेखनाची गती ८० श.प्र.म्र्र्रि., ( ) मराठी टंकलेखनाची गती ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० श.प्र.मि. (शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक.)

(३) जवानराज्य उत्पादन शुल्क – एकूण ५६८ पदे (अजा – ८१, अज – ३, विजा-अ – १४, भज-ब – १९, भज-क – २५, भज-ड – १३, इमाव – १२३, विमाप्र – ८, आदुघ – ५७, खुला – २२५) (अनाथांसाठी ६ पदे राखीव). पात्रता : १० वी उत्तीर्ण.

(४) जवान नि वाहनचालक राज्य उत्पादन शुल्क – एकूण ७३ पदे (अजा – ८, भज-ब – ४, भज-क – ४, भज-ड – ५, इमाव – ३०, विमाप्र – ३, आदुघ – ७, खुला – १२) (अनाथांसाठी १ पद राखीव). पात्रता : (i) इयत्ता ७ वी उत्तीर्ण़, (ii) वाहन चालविण्याचा परवाना (किमान हलके चारचाकी वाहन) (हलके/ जड चारचाकी वाहन चालविण्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.)

(ब) जिल्हा स्तरावर भरावयाची पदे –

(५) चपराशी – एकूण ५३ पदे. पात्रता : १० वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : सर्व पदांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे. (कमाल वयोमर्यादा – खुला गट (अमागास) – ४० वर्षे; मागासवर्गीय/ आदुघ/ दिव्यांग/ भूकंपग्रस्त/ प्रकल्पग्रस्त/अनाथ – ४५ वर्षे; प्रावीण्यप्राप्त खेळाडू – ४३ वर्षे (सर्व कॅटेगरीजसाठी); पदवीधर/ पदविकाधारक अंशकालीन – ५५ वर्षे; माजी सैनिक (खुला (अमागास) – ३८. सेवा कालावधी ३ वर्षे, माजी सैनिक (मागासवर्गीय/आदुघ) – ४३ सेवा कालावधी ३ वर्षे). (जवान व जवान-नि-वाहनचालक पदांसाठी दिव्यांग उमेदवार पात्र नाहीत.)

शारीरिक पात्रता : जवान आणि जवान नि वाहनचालक पदांसाठी –

पुरुष – उंची – किमान १६५ सें.मी., छाती – ७९-८४ सें.मी. महिला – उंची – किमान १६० सें.मी., वजन – ५० कि.ग्रॅ.

वेतन श्रेणी : लघुलेखक (निम्नश्रेणी) – एस -१५ (रु. ४१,८०० – १,३२,३००) अंदाजे वेतन दरमहा रु. ७५,०००/-.

लघुटंकलेखक : एस -८ (रु. २५,५०० – ८१,१००) अंदाजे वेतन दरमहा रु. ४७,०००/-.

जवान व जवान-नि-वाहनचालक – एस – ७ (रु. २१,७०० – ६९,१००) अंदाजे वेतन दरमहा रु. ४०,०००/-.

चपराशी – एस -१ (रु. १५,००० – ४७,६००) अंदाजे वेतन दरमहा रु. २६,०००/-.

निवड पद्धती : सर्व पदांसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा. (१) लघुलेखक (निम्न श्रेणी), (२) लघुटंकलेखक, (३) जवान, (४) जवान-नि-वाहनचालक पदांसाठी बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी विषयांवर आधारित प्रत्येकी ३० प्रश्न, प्रत्येक प्रश्नास १ गुण, एकूण १२० प्रश्न, १२० गुण, वेळ १ तास, ३० मिनिटे.

पद क्र. ५ चपरासी – बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी विषयांवर आधारित प्रत्येकी ५० प्रश्न, एकूण २०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नास १ गुण, एकूण २०० गुण, वेळ २ तास.

जवान व जवान-नि-वाहनचालक पदासाठी लेखी परीक्षा १२० गुण व शारीरिक मैदानी परीक्षा ८० गुण, एकूण २०० गुण जवान-नि-वाहनचालक पदासाठी पात्रता स्वरूपाची चाचणी – हलके/ जड मोटार वाहन चालविणे.

चपराशी पदासाठी लेखी परीक्षा २०० गुणांसाठी. लघुलेखक (निम्नश्रेणी) व लघुटंकलेखक पदांसाठी लेखी परीक्षा १२० गुण आणि लघुलेखन कौशल्य व्यावसायिक चाचणी ८० गुण, एकूण २०० गुण. चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील.

शारीरिक पात्रता पडताळणी व मैदानी चाचणी – संबंधित जिह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी, जिल्हा निवड समितीमार्फत घेण्यात येईल. जवान व जवान-नि-वाहनचालक पदांसाठी – पुरुष – १.५ कि.मी. धावणे ३० गुण, १०० मी. धावणे – ३० गुण, गोळाफेक २० गुण, एकूण ८० गुण.

महिला – १ कि.मी. धावणे – ३० गुण, १०० मी. धावणे, ३० गुण, गोळाफेक – २० गुण, एकूण ८० गुण.

परीक्षा शुल्क : लघुलेखक (निम्नश्रेणी) व लघुटंकलेखक पदांसाठी अराखीव (खुला गट) – रु. ९००/-, राखीव प्रवर्ग – रु. ८१०/-

जवान पदासाठी अराखीव खुला गट रु. ७३५/-, राखीव प्रवर्ग रु. ६६०/-.

जवान-नि-वाहनचालक व चपराशी पदांसाठी अराखीव (खुला गट) रु. ८००/-, राखीव प्रवर्गासाठी रु. ७२०/-.

अर्ज भरताना एखादा तांत्रिक मुद्दा उपस्थित झाल्यास TCS ला ७३५३९२६६६३ या नंबरवर संपर्क साधावा.

ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक १ डिसेंबर २०२३ (१७.०० वाजे) पर्यंत ऑनलाइन अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जाहिरातीमध्ये पॅरा १२.२.१ येथे दिल्याप्रमाणे अपलोड करणे आवश्यक.

ऑनलाइन अर्ज करण्याकरिता ऑनलाइन लिंक विभागाच्या खालील नमूद संकेतस्थळावर उपलब्ध असेल. https:// stateexcise. maharashtra. gov. in ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज सादर करताना जिल्हा (परीक्षा) केंद्राची निवड करणे आवश्यक.

राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्स लिमिटेड ( RCFL), मुंबई (भारत सरकारचा एक उपक्रम) ( Advt. No. ०२११/२०२३) RCFL मध्ये पुढील डिसिप्लिन्समधील मॅनेजमेंट ट्रेनी पदांची भरती. एकूण रिक्त पदे – २५.

(१) मॅनेजमेंट ट्रेनी (मटेरियल्स) – २३ पदे (अजा – ३, अज – २, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – २, खुला – १०) (१ पद दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव कॅटेगरी OA/ OL/ DL/ LV/ HH).

पात्रता : (दि. १ सप्टेंबर २०२३ रोजी) पेट्रोकेमिकल/ केमिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रूमेंटेशन/ इलेक्ट्रिकल किंवा अलाईड सब्जेक्टसमधील इंजिनीअरिंग पदवी अंतिम वर्षात किमान ६० टक्के गुणांसह (अजा/अजसाठी ५५ टक्के गुण) उत्तीर्ण आणि बॉयलर ऑपरेशन इंजिनीअर्स सर्टिफिकेट ( इडए)/ बॉयलर प्रोफिशिअन्सी सर्टिफिकेट.

(२) मॅनेजमेंट ट्रेनी (लॉ) – २ पदे (खुला).

पात्रता : कायदा विषयातील पदव्युत्तर पदवी (LL. M.) अंतिम वर्षात किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

वयोमर्यादा : दि. १ सप्टेंबर २०२३ रोजी २७ वर्षे. (पदे उपलब्ध असल्यास अजा – ३२ वर्षे; इमाव – ३० वर्षे; दिव्यांग – खुला/ ईडब्ल्यूएस; इमाव; अजा/अज – ३७; ४०; ४२ वर्षे).

निवडलेल्या उमेदवारांना प्री-एम्प्लॉयमेंट मेडिकल टेस्ट द्यावी लागेल.

शंकासमाधानासाठी www. rcfltd. com या वेबसाईटवर ‘Grienvance Link’ उपलब्ध आहे.

कामाचे स्वरूप : RCFL चे थळ-अलिबाग आणि ट्रॉम्बे-मुंबई येथे २ मॅन्युफॅक्चरिंग युनिटस आहेत आणि त्यांचे देशभरात मार्केटिंग नेटवर्क आहे. निवडलेल्या उमेदवारांना कोणत्याही युनिटमध्ये नेमणूक दिली जाईल.

वेतन आणि इतर सुविधा : निवडलेल्या उमेदवारांना १ वर्षाच्या ट्रेनिंग दरम्यान दरमहा रु. ३०,०००/- एकत्रित वेतन दिले जाईल. याशिवाय कामाच्या ठिकाणी फ्री अकोमोडेशन दिले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना ए1 ग्रेडवर नेमणूक दिली जाईल. अंदाजे दरमहा वेतन रु. ८१,९००/-. शिवाय उमेदवारांना परफॉर्मन्स रिलेटेड पे (PRP), फ्री मेडिकल सुविधा, ग्रॅच्युईटी/ कॉन्ट्रीब्युटरी प्रोव्हिडंट फंड इ. सुविधा मिळतील. उमेदवारांना मुंबई व थळ सोडून इतर लोकेशन्सवर नेमणूक दिल्यास त्यांना रु. २,५००/- अधिकचे दिले जातील.

निवड पद्धती : ऑनलाइन टेस्ट कॉम्प्युटर बेस्ड ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि पर्सोनल इंटरव्ह्यू. ऑनलाईन टेस्टविषयी विस्तृत माहिती अॅडमिट कार्डमधून दिली जाईल.

ऑनलाइन टेस्ट मुंबई/ ठाणे/ नवी मुंबई/ MMR, नागपूर, भोपाळ, बेंगळूरु, हैदराबाद, दिल्ली इ. केंद्रांवर घेतली जाईल. ऑनलाइन टेस्टमध्ये २ पार्ट्स असतील. पार्ट-१ – संबंधित विषयावर आधारित ५० प्रश्न प्रत्येकी २ गुणांसाठी. पार्ट-२ – अॅप्टिट्यूड संबंधित प्रश्न. (जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड, रिझनिंग अॅण्ड जनरल नॉलेज/ अवेअरनेस यावर आधारित ५० प्रश्न, प्रत्येकी १ गुणासाठी). ऑनलाइन टेस्टचा कालावधी ९० मिनिटांचा असेल. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जातील.

ऑनलाइन टेस्टची तारीख उमेदवारांना अॅडमिट कार्डमधून दिली जाईल. जो ते www. rcfltd. com या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल.

अंतिम निवड : कॅटेगरीनुसार गुणवत्ता यादी बनविताना ऑनलाइन टेस्टमधील गुणांना ८० टक्के वेटेज दिले जाईल व पर्सोनल इंटरव्ह्यूमधील गुणांना २० टक्के वेटेज दिले जाईल.

अर्जाचे शुल्क : रु. १,०००/- जीएस्टी. (अजा/ अज/ दिव्यांग/ माजी सैनिक/महिला उमेदवारांना फी माफ आहे.)

अर्जासोबत (१) ४.५ बाय ३.५ सें.मी. आकाराचा रंगीत फोटोग्राफ, (२) स्वाक्षरी, (३) डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी (Left hand thumb impression), (४) स्व-हस्ताक्षरातील डिक्लेरेशन स्कॅन करून अपलोड करावयाची आहेत.

ऑनलाइन अॅप्लिकेशन रजिस्ट्रेशन www. rcfltd. com या संकेतस्थळावर दि. १ डिसेंबर २०२३ रोजी (१७.०० वाजेपर्यंत) करता येईल. ( HR & gt; Recruitment & gt; Apply Online & gt; & Registration & gt; Payment of Fees & gt; Document Scan & Upload) (आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत.)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments