रिपोर्टर :- निलेश गरवारे
काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या वर्धापनदिनाच्या औचित्यार्थ दि. २८ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथे “है तैयार हम” ही महारॅली आयोजित केली असून या कार्यक्रमास राष्ट्रीय नेत्या आदरणीय सोनियाजी गांधी, श्री.मल्लिकार्जुन खरगे (अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी), राहुलजी गांधी, प्रियांकाजी गांधी वाड्रा, के.सी.वेणुगोपाल जी (संघटन महासचिव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी) यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशभरातून काँग्रेस पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. आज शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे काँग्रेस पक्षाचे महारहस्त्र राज्य प्रभारी मा.श्री.रमेशजी चेन्नीथला, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय मा.ना.श्री.अशोकराव चव्हाण साहेब व श्री.नाना पटोले यांच्या सूचनेनुसार है तैयार हम या महारॅलीला जास्तीत जास्त लोक उपस्थित राहतील याचे नियोजन करण्यासाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विशेष निरीक्षक म्हणून निरीक्षक मा.श्री.प्रदीप नरवाल जी(सचिव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी) व श्री मुजाहिद खान यांनी नियोजनाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे नेते डॉ.अंकुश देवसरकर, हिंगोलीचे लोकप्रिय नेते माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, दिलीपराव देसाई (अध्यक्ष, हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी), द्वारकासेठ सारडा (उपाध्यक्ष, हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी तथा माजी जिल्हा परिषद सदस्य), सुनील भैया गोरेगावकर, शेख कलीम (महासचिव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस), शोभा ताई मोगले (अध्यक्षा, हिंगोली जिल्हा महिला काँग्रेस) बापूराव पाटील वडदकर (अध्यक्ष, हिंगोली तालुका काँग्रेस कमिटी), भास्कर बेंगाळ (अध्यक्ष, सेनगाव तालुका काँग्रेस कमिटी), राजाराम खराटे (अध्यक्ष, वसमत तालुका काँग्रेस कमिटी), भागवतराव चव्हाण (अध्यक्ष, कळमनुरी तालुका काँग्रेस कमिटी),बालाजी कर्डीले (अध्यक्ष, हिंगोली जिल्हा युवक काँग्रेस), पवन उपाध्याय (अध्यक्ष, हिंगोली शहर काँग्रेस) अमर शुक्ला (अध्यक्ष, हिंगोली जिल्हा उत्तर भारतीय सेल काँग्रेस), वर्षाताई मोरे (अध्यक्षा, हिंगोली तालुका महिला काँग्रेस) अलीमुद्दीन शेख (अध्यक्ष, वसमत शहर काँग्रेस) यांच्या सह संपूर्ण जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.अंकुश देवसरकर, हिंगोलीचे लोकप्रिय नेते माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, दिलीपराव देसाई (अध्यक्ष, हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी) यांनी केले.