Friday, December 6, 2024
Homeताज्या-बातम्यानांदेड : मराठा आंदोलन पेटले; आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या वाहनाची तोडफोड

नांदेड : मराठा आंदोलन पेटले; आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या वाहनाची तोडफोड

नांदेड : नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे हे पिंपळगाव निमजी (ता. जि. नांदेड) कीर्तन कार्यक्रमासाठी आले असता, शुक्रवारी रोजी रात्री उशिरा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी वाहनावर दगडफेक करून काचा फोडल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात आमदार मोहनराव हंबर्डे बचावले, मात्र त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

सप्ताहाच्या कीर्तनासाठी आमदार हंबर्डे हे पिंपळगाव निमजी येथे आले होते. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गावात प्रवेश बंदी असल्याची सूचना देऊन आमदारांना गावात येण्यास मनाई केली होती. मात्र, आमदारांनी हट्ट धरल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी आमदार यांच्या वाहनावर दगडफेक केली, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात आमदार हंबर्डे बचावले, मात्र त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments