आज दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभरून तांडा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. सुरुवातीला शालेय विद्यार्थी सोबत गावकरी यांनी गावातून प्रभात फेरी काढली. प्रभात फेरीमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध घोषणा देण्यात आल्या. ध्वजारोहण झाल्यानंतर यश कांबळे, वैष्णवी जाधव, विराट जाधव, यश आडे, जगदीश जाधव,ऋषी पवार, शशिकांत राठोड, विशाल जाधव या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारक व समाजसुधारक यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.
यानंतर सर्वांनी मिळून शाळेत व परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच वृक्ष संवर्धन करण्याचा निर्धार करण्यात आला. अपनी माटी अपना देश ही संकल्पना राबवत प्रतिज्ञा घेण्यात आली. सोबतच निपुण भारत मिशन अंतर्गत लीडर माता यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला उपसरपंच विठ्ठलराव जाधव, ग्रामसेवक जीवनकुमार राठोड, शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षकवृंद, शा. व्य. समिती अध्यक्ष ,सदस्य ,ग्रा. प. सदस्य, शिक्षकप्रेमी तथा नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विश्वजित देडे सर यांनी केले तर सुश्राव्य सुत्रसंचालन श्री राजकुमार मोरगे सर यांनी केले. शेवटी श्री किशोर पालेवर सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.