वाशीम : वाशीम येथील जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी मनोज जरांगे पातूरमार्गे वाशीम शहरात येत असताना सकल ओबीसी समाज बांधवानी त्यांना काळे झेंडे दाखवीत, रस्त्यावर गोमूत्र शिंपडून निषेध व्यक्त केला. मनोज जरांगे हे राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करीत आहेत. ते भाषणात नेहमीच ओबीसी नेते छगन भुजबळ व इतर नेत्यावर बोलतात त्यांना दुसरे नेते दिसत नाहीत का, असा सवाल सकल ओबीसी समाज बांधवानी केला.
मनोज जरांगे पातूर – मालेगाव – मार्गे वाशीम कडे येत असताना आज दुपारी ४ ते ४:३० वाजेदरम्यान सिद्धू धाब्याजवळ “मनोज जरांगे हाय हाय, चले जाव चले जाव” अशा घोषणा देत काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्तात मनोज जरांगे यांचा ताफा सभेकडे रवाना झाला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर गोमूत्र शिंपडून निषेध व्यक्त केला.