केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. तर राजस्थानमध्ये भाजपच्या दोन खासदारांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवून पराभव पत्करावा लागला आहे.
मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये भाजपने केंद्रातील काही मंत्री व खासदारांना मैदानात उतरविले होते. बहुतेक नेत्यांनी विधानसभा निवडणुकीतही यश संपादन केले आहे. परंतु काहींना मानहानीकारक पराभव पत्करावा लागला आहे. यात केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते प्रमुख आहेत. ते मध्य प्रदेशातील निवास या मतदारसंघातून निवडणूक लढवित होते. त्यांना काँग्रेसचे चैनसिंह वरकडे यांनी पराभूत केले आहे.
त्याचप्रमाणे राजस्थानमधील भाजपचे दोन खासदार देवजी पटेल व खासदार भगिरथ चौधरी पराभूत झाले आहे. खासदार देवजी पटेल सांचोर या मतदारसंघातून निवडणूक लढवित होते. या मतदारसंघातून भाजपचे बंडखोर जीवाराम चौधरी विजय झाले आहे. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे सुखराम विश्नोई राहिले. खासदार देवजी पटेल यांना तिसर्या क्रमांकाची मते मिळाली आहे. त्याचप्रमाणे किशनगड मतदारसंघातून भाजपचे उमेदवार खासदार भागिरथ चौधरी होते. त्यांना काँग्रेसचे विकास चौधरी यांनी पराभूत केले. या मतदारसंघातही भागिरथ चौधरी यांना तिसर्या क्रमांकाची मते मिळाली.मंडावातून खासदार नरेंद्रकुमार हे पराभूत झाले आहेत.
नरोत्तम मिश्रा पराभूत
मध्य प्रदेशचे वादग्रस्त गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना दतिया मतदारसंघातून पराभव पत्कारावा लागला. गेल्या तीन निवडणुकांमध्ये त्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. परंतु काँग्रेसचे भारती राजेंद्र यांनी त्यांचा पराभव केला.
‘हे’ खासदार विजयी
मध्य प्रदेशातून केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर हे दिमानी (मध्य प्रदेश), केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल (नरसिंगपूर), कैलाश विजयवर्गीय (इंदूर एक), खा. रीती पाठक (सिधी), खा.उदयप्रतापसिंह (गदरवारा), खा.राकेशसिंह (जबलपूर पश्चिम) हे मंत्री व खासदार विजयी झाले आहेत. तर राजस्थानातून खा. राज्यवर्धन राठोड (झोटवाड), खा. बाबा बालकनाथ (तिजारा), किरोडीलाल मीना (सवाई माधोपूर), खा. दीयाकुमारी (विद्याधरनगर).