Friday, December 6, 2024
Homeमराठवाडाकळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांची मंत्रीमंडळात होणार समावेश?

कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांची मंत्रीमंडळात होणार समावेश?

नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे  गटाचे; कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार.! संतोष बांगर यांची मंत्रीमंडळात समावेश होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

संतोष बांगर यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांनी मुंबई हुन स्पेशल विमान पाठवले असून, हैद्राबाद मधील रूग्णालयात असलेल्या बांगर यांना तातडीने मुंबई’ला बोलावन्यात आले आहे. तर त्यांची यावेळी मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची चर्चा सध्या चालू आहे.

कळमनुरी विधानसभा मतदारसंघात १९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. येथे महायुतीत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर, महाविकास आघाडीत शिवसेना उबाठा पक्षाचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांच्यात दुरंगी लढत होती. यार्मेध्ये आमदार संतोष बांगर यांनी 31 हजार 254 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments