Thursday, September 19, 2024
Homeदक्षिण भारत राज्यकयाधू नदीवर आत्मक्लेष आंदोलन

कयाधू नदीवर आत्मक्लेष आंदोलन

हिंगोली :- छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवण येथे कोसळल्याने जांभरुन रोडगे येथील कयाधु नदी पात्रात उतरून आत्मक्लेष आंदोलन डॉक्टर विठ्ठल रोडगे यांच्या नेतृत्वात करण्यात आला यावेळी शेकडो शिवप्रेमीनी छत्रपती शिवराय आम्हाला माफ करा..माफ करा अशा घोषणा दिल्या.मालवन येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा ज्यांनी बनविला त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली.

या आत्मक्लेष आंदोलन दरम्यान नदीपत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्ध व जल अभिषेक करण्यात आला.या आंदोलनात जांभरुन रोडगे पारडी पोहकर येथील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आत्मक्लेष आंदोलन दरम्यान डॉक्टर विठ्ठल रोडगे , गजानन पोहकर, डॉ राम रोडगे, परमेश्वर पोहकर,धारु पाटील, हरिदास मुटकुळे, दामु पोहकर, विठ्ठल जोगदंड, ज्ञानेश्वर रोडगे, महादा रोडगे, माणिक रोडगे ,भिकाजी रोडगे, लीना जाधव, माणिक रोडगे, तुळशीराम रोडगे, अर्जुन कोटकर , शिवाजी कऱ्हाळे, बालाजी तावरे शंकर जाधव, केदार रोडगे, विजय रोडगे ,लक्ष्मण रोडगे ,बालाजी तावरे, गजानन कोटकर, बाबुराव रोडगे, जगन रोडगे, पांडुरंग रोडगे, धनाजी रोडगे ,शामराव रोडगे, प्रल्हाद रोडगे, शिवाजी रोडगे,हनुमान रोडगे, विश्वनाथ रोडगे, रामेश्वर रोडगे, जगन खरात, दतराव रोडगे, हनुमान रोडगे, यांच्यासह परिसरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सेनगाव पोलिसांनी कडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments