Saturday, November 2, 2024
Homeताज्या-बातम्याउत्तर महाराष्ट्र, विदर्भात गारठा कायम; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात वाढीचा अंदाज

उत्तर महाराष्ट्र, विदर्भात गारठा कायम; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात वाढीचा अंदाज

पुणे : राज्यावर सध्या कोणतीही हवामान विषयक प्रणाली सक्रिय नाही. त्यामुळे राज्यभरात कोरडे वातावरण आहे. पुढील पाच दिवस उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात गारठा कायम राहणार आहे. दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे.

राज्यावर सध्या हवामान विषयक कोणतीही प्रणाली सक्रिय नाही, त्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. पुढील पाच दिवस उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव कायम राहणार असल्यामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहणार आहे. दक्षिण भारताकडून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे कोकण किनारपट्टी, दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहून रात्री किंवा पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments