श्री क्षेत्र नरसी नामदेव येथे रक्षाबंधन व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे निधी वाटपाचे औचित्य साधुन कार्यसम्राट आमदार तान्हाजीराव मुटकुळे साहेब यांनी विधानसभेतील नर्सी नामदेव येथील सेवाधारी लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून साड्या वाटपाचा कार्यक्रम केला. या वेळीं हजारो सेवाधारीबहिणी उपस्थिती होत्या. या वेळीअद्यापही राहिलेले बहिणीचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्याकरिता शिबिराचे आयोजन आमदार साहेब यांनी केले होते.
या वेळीं मा. आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांच्या सौभाग्यवती सौ. जिजाबाई मुटकुळे यांच्या हस्ते सेवाधारी महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यानिमित्ताने संभाजीनगर येथील गायक कलावंतांचा गीत गुंजन हा अभंग व भावगीतांचा कार्यक्रम सुद्धा डॉक्टर संजय नाकाडे व हर्षवर्धन परसावळे यांचे पुढाकाराने सादर करण्यात आला. गीत गुंजन चे गायक कलावंत वर्षा जोशी ,वैभव पांडे ,वादक: राजू तायडे , गजानन धुमाळ शांतीभूषण देशपांडे , विनोद वाव्हळ निवेदक:श्रीकांत उमरीकर यांनी अतिशय सुरेल अभंग व भावगीते सादर करून उपस्थित महिला भगिनींची मने जिंकली.
उपस्थित महिलांनी सुद्धा कलावंतांना भरभरून दाद दिलीया वेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे,महिला जिल्हाध्यक्ष उज्वलाताई तांबाळे,मा.आ.रामराव वडकुते, के.के.शिंदे,नारायणराव खेडेकर, बळीरामजी मुटकुळे,युवमोर्चा अध्यक्ष पप्पुभाऊ चव्हाण, शिवाजी मुटकुळे,रामदास पाटील , भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव सौ रजनी पाटील,सरचिटणीस छायाताई मरडे,महिला शहरअध्यक्ष अल्का लोखंडे, सौ.राजामती शिवाजीराव मुटकुळे, संतोष टेकाळे,श्रीरंग राठोड,नंदू खिल्लारे,हिंमत राठोड,माणिकराव लोढे, कांतराव घोंगडे शंकरराव बोरुडे,अशोक ठेंगल,सतीशराव खाडे, आप्पासाहेब देशमुख, श्रीराम देशमुख,अमोल तिडके, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.