Thursday, October 3, 2024
Homeमहाराष्ट्रआमदार तान्हाजीराव मुटकुळे यांची जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमा अंतर्गत...

आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांची जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमा अंतर्गत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावलेली जि .प .उच्च प्राथमिक शाळा ईडोळी शाळेस भेट

• सन्मान कर्तुत्वाचा ,गौरव शिक्षक व गावकऱ्यांचा •

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इडोळी शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुदर शाळा या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवत प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल हिंगोली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांनी जि प उच्च प्राथमिक शाळा इडोळी ता जि हिगोली शाळेस सदिच्छा भेट दिली.

याप्रसंगी आमदार तान्हाजीराव मुटकुळेनी मार्गदर्शन केले, तसेच सर्व शिक्षकांचा , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष , उपाध्यक्ष सर्व गावकरी मंडळींचा सत्कार करून पूज्य साने गुरुजी यांची प्रतिमा भेट देऊन सर्वांचा गुणगौरव करण्यात आला. आपल्या हातून शाळेच्या विकासाचे असेच कार्य घडत राहो . गावकऱ्याच्या सहकार्याचे कौतुक केले व उत्तरोत्तर असेचे यश संपादन होवो ; अशा शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

यावेळी आ. तान्हाजीराव मुटकुळे, भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे,भाजपा ज्येष्ठ नेते के.के.शिंदे,नारायण खेडेकर, जगननाथ महाराज जाधव ,भानुदासराव जाधव, संतोषराव टेकाळे,प्रितम सरकटे, भिकाजीराव जाधव पाटील , तान्हाजी जाधव , माधवराव जाधव , हनुमान जाधव ,विजय धाकतोडे, नारायणराव साबळे , ज्ञानबा मामा पानपट्टे , विठठलराव जाधव तसेच ईडोळी येथील सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य, शिक्षण प्रेमी मंडळी मुख्याध्यापक श्री आत्माराम जाधव,सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments