हिंगोली :- मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी इतरत्र जिल्ह्यात प्रवेश घ्यावा लागत होता. त्या अनुषंगाने खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा क्षेत्रात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी पुढाकार घेत, सततच्या पाठपुराव्यातून यश मिळवत, आता हिंगोली वैद्यकीय महाविद्यालय 100 विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना आता आपल्या जिल्ह्यातच वैद्यकीय शिक्षणाची सोय उपलब्ध झाल्याने, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे. हिंगोली जिल्ह्याची मागासलेपणाची ओळख पुसण्यासाठी माजी खासदार हेमंत पाटील यांनी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत, हिंगोलीकरांसाठी विविध सोयी- सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामध्ये मुंबईला जाण्यासाठी हिंगोली येथून जनशताब्दी एक्सप्रेस, बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र, आकाशवाणी केंद्र, लिगो प्रकल्प, येलदरी धरणातून डावा कालवा काढण्यासंदर्भात सर्वेक्षण, हिंगोली एमआयडीसी भागात पाणीपुरवठा करण्यासह इतरही विविध माध्यमातून विकासाचा सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवत कार्य केले.
हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठीची सोय आपल्या जिल्ह्यातच निर्माण व्हावी, यासाठी हिंगोली येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, केंद्रीय आरोग्य मंत्री, वैद्यकीय मंत्री, तसेच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मागील 3 वर्षापासून सतत पाठपुरावा केला. यानंतर वैद्यकीय महाविद्यालय इमारतीसाठी आवश्यक जमीन संपादन करणे, प्राध्यापकांची नियुक्ती करणे, प्राथमिक स्तरावर भाडेतत्त्वावर इमारत उपलब्ध करून देणे, प्रायोगिक, वैद्यकीय व इतरही साहित्य-सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात संबंधित यंत्रणा व विभागाशी समन्वय ठेवत वेळोवेळी सहकार्य केले. या अनुषंगाने मागील तीन वर्षाच्या सततच्या पाठपुरावातून हिंगोली येथे वैद्यकीय महाविद्यालयात 100 विद्यार्थी क्षमता असलेले प्रवेश प्रक्रिया राबविण्यात शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची सोय आपल्या स्वतःच्या जिल्ह्यात उपलब्ध झाल्याने आनंद व्यक्त करत आहेत.
प्रतिक्रिया :- हिंगोली येथील वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात, माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ, तसेच जिल्हा प्रशासन विभाग प्रमुखाशी पत्रव्यवहार व आवश्यकता कागदपत्रांची पूर्तता करत, सततचा पाठपुरावा केला. या पाठपुराव्यामुळे हिंगोली येथे नव्याने वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. आता हिंगोली लोकसभा क्षेत्रातील व इतरही भागातील सर्वसामान्य कुटुंबातील 100 विद्यार्थ्यांना कमी खर्चात वैद्यकीय शिक्षण घेण्यास मदत होईल. तसेच हिंगोली येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू केल्याबद्दल केंद्र व राज्य शासनाचेही आभार. – बाळासाहेब ठाकरे(हरिद्रा) हळद संशोधन केंद्र, अध्यक्ष तथा मंत्री हेमंत पाटील.