Friday, December 6, 2024
Homeताज्या-बातम्याअशोक चव्हाण यांनी घेतली राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ

अशोक चव्हाण यांनी घेतली राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ

भाजप नेते अशोक चव्हाण यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यानंतर चव्हाण यांनी शपथ घेतली आहे. अशोक चव्हाण यांनी मराठी भाषेत शपथ घेतली. राज्यसभा सभापती जगदिप धनखड यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेल्यानंतर आपली पहिलीच प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण म्हणाले की, ”आपण महाराष्ट्राचे आहोत, मराठी लोकांचं मला प्रेम मिळाले. म्हणून मराठीतून शपथ घेतली. मी विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभेत काम करण्याची संधी मला मिळाली. चार ही सभागृहात काम करण्याची मला संधी मिळाली. वेगळा अनुभव मला राज्यसभेत येईल. योगायोग की आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षांसोबत शपथ घेण्याची संधी मिळाली आणि आज भाजपचा स्थापना दिवस आहे.”

भिवंडी आणि सगळी येथील लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलताना ते म्हणाले, ”विनाकारण काही बातम्या दाखवल्या गेल्या, त्यात माझा दुरान्वये संबंध नाही. त्यांचे अपयश झाकण्याकरिता किंवा कांग्रेस हायकमांड समोर काहीतरी सांगण्याचा हा प्रयत्न आहे. सांगलीची जागा परंपरेनं वसंतदादा पाटील यांच्या नावानं ओळखली जाते आणि भिवंडीची जागा कोकणात एकमेव आहे, मी असे निर्णय कधी घेतले नाहीत.”

काँग्रेसचा आणखी एक बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करेल, अशी चर्चा आहे. याचबद्दल त्यांना पत्रकारांशी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ”मी भाजपमध्ये येताना कोणालाही सोबत घेऊन आलो नाही. याबाबत मला जास्त काही माहीत नाही. लोकसभेच्या निवडणूकीच्या निकालानंतर भाजपची सत्ता १०० टक्के येणार आहे.”

शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याचबद्दल त्यांना विचारलं असता ते म्हणाले, ”जर तर वर मी बोलणार नाही. पण जे जे लोक भाजपसाठी उपयुक्त ठरतील, त्यांचे स्वागत आहे. युद्ध सुरू आहे. युद्धात आत्मविश्वासानं जावं लागेल. पण जनतेचा कौल महत्त्वाचा आहे. लोकांचा मोदींवर विश्वास आहे. मोदीजींची गॅरंटीची आहे. मी परिक्षेत उतरलो आहे आणि मी कोणत्याही परिक्षेत तयारीनं जातो.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments