Sunday, December 8, 2024
Homeताज्या-बातम्याअशोक चव्हाणांसोबत अनेक नेते भाजपच्या वाटेवर? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'आगे आगे देखो..'

अशोक चव्हाणांसोबत अनेक नेते भाजपच्या वाटेवर? देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आगे आगे देखो..’

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. तर आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन यासंबधी चर्चाही केली आहे. अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. त्याबाबत बोलताना आज भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘मी तर हे तुमच्याकडून ऐकलं आहे. मी एवढचं सांगेन की, काँग्रेसमधले अनेक नेते हे भाजपच्या संपर्कात आहेत, गेली काही वर्ष काँग्रेस जी वाटचाल करतोय, त्यामुळे अनेकांची घुसमट होतेय’, असं फडणविसानी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘भाजपसोबत अनेक पक्षातील बडे नेते येण्यासाठी इच्छुक आहेत. विशेषत: काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला नेते कंटाळलेले आहेत. काँग्रेसमधील मुस्कटदाबी आणि मोदींच्या नेतृत्त्वातील भारताची प्रगती पाहता, अनेक नेत्यांना वाटतं की मुख्य प्रवाहात यायला हवं. त्यामुळे आमच्या कोण कोण संपर्कात आहेत, भाजपमध्ये कोण कोण येणार याबाबत मी इतकंच सांगेन, आगे आगे देखीए, होता है क्या! असंही ते म्हणालेत.

महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षातील नेते आमच्या संपर्कात आहेत. काही लोकांना यायचं आहे, ते येत आहेत. मोदींजीसोबत, भाजपसोबत यायला हवं, ही त्यांची भावना झालेली आहे. काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत. गेली काही वर्ष काँग्रेस जी वाटचाल करतोय, त्यामुळे अनेकांची घुसमट होतेय. ‘आगे आगे देखिए होता है क्या’, असंही ते पुढे म्हणालेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments