समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद हिंगोली मार्फत अनुसुचित जाती व नवबौध्द घटकाच्या वस्तीचा विकास करणे या योजने अंतर्गत दर पाच वर्षांनी बृहत आराखडा घोषित करण्यात येतो. त्या अनुषंगाने सन 2023- 24 ते 2027-28 या पाच वर्षांच्या कालावधीचा हिंगोली जिल्हयातील ग्रामपंचायती मार्फत गावनिहाय घोषित केलेल्या अनुसुचित जातीच्या वस्त्यांचा एकत्रीत बृहत आराखडा तयार करुन गट विकास अधिकारी पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषदेस प्राप्त झालेला आहे. जिल्हा परिषदे मार्फत संपुर्ण जिल्हयाचा एकत्रीत बृहत आराखडा तयार करण्यात आलेला असुन पंचायत समितीकडे प्रसिध्दी करिता पाठविण्यात आलेला आहे…तेंव्हा सर्व जनतेस कळविण्यात येते की, अनुसुचित जाती व नवबौध्द घटकाच्या वस्तीचा विकास करणे या योजने सन सन 2023-24 ते 2027-28 या पाच वर्षाच्या कालावधीचा बृहत आराखडा त्या त्या तालुक्याच्या पंचायत समिती मध्ये तसेच समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, हिंगोलीच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आलेला आहे. सदर बृहत आराखडयावर काही सुचना व हरकती असल्यास त्यांनी संबंधीत पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्या कडे दिनांक 20/10/2023 रोजी पर्यंत दाखल कराव्यात. तदनंदर आलेल्या सुचना व हरकती विचारात घेतल्या जाणार नाही. असे आवाहन मा. श्री. संजय देने, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली, मा.श्री.अनुप शेंगुलवार, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मा. श्री. आर. एच.येडके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी केले आहे.